मनसेची आज ठाण्यात कार्यशाळा; राज ठाकरे घेणार पदाधिकार्‍यांची शिकवणी!

Foto

ठाणे : लोकसभा निवडणुकीनंतर येणार्‍या विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांची कार्यशाळा आज ठाणे येथे आयोजित करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी विधानसभा निवडणुकीबाबत मनसेच्या पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करणार आहेत. 

 या कार्यशाळेच्या निमित्ताने राज ठाकरे पदाधिकार्‍यांशी संवाद साधून, आगामी विधानसभा निवडणुकीत कशाप्रकारे प्रचार केला पाहिजे, कोणते मुद्दे घेतले पाहिजेत याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच संघटनात्मक पातळीवर नेतृत्व बदलाच्या हालचालीबाबतही कार्यशाळेत चर्चा केली जाणार आहे.यावेळी लोकसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार उभे न करता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात ठिकठिकाणी प्रचारसभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. सभेत राज यांनी मोदींच्या भाषणाचे व्हिडीओ सादर करत मोदी सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील कारभाराची पोलखोल केली. भाजपविरोधात प्रचाराची रणधुमाळी गाजवल्यानंतर राज ठाकरे आज पदाधिकार्‍यांना नेमके काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker